रूढी व प्रथा हे आदिवासींचे संविधान आहे

जागतिक आदिवासी दिनानिमित्त मालाडमध्ये आदिवासी सांस्कृतिक शोभायात्रेची तयारी

आदिवासी ग्रामसभा मालाड आणि आदिवासी वॉर्डस्तरीय वनहक्क समिती मालाड पूर्व यांच्या संयुक्त पुढाकारातून जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी सांस्कृतिक शोभायात्रेचे निमंत्रण फलक मालाड परिसरात लावण्यात आले.

संस्कृती आणि परंपरा

आदिवासी समाजाची ओळख ही केवळ परंपरा आणि पोशाखापुरती मर्यादित नसून ती निसर्गसंरक्षण, सामूहिक जीवनपद्धती, श्रमसंस्कृती आणि स्वाभिमान यांच्याशी जोडलेली आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमांमधून नव्या पिढीपर्यंत आपल्या इतिहासाची, हक्कांची आणि जबाबदाऱ्यांची जाणीव पोहोचविणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

दिनांक ४ ऑगस्ट २०२६.

देवडोंगर आदिवासी पाडा, बारीक पायरी-भाटुगली पाडा क्रमांक १ व २ आणि निंबोणी पाडा या भागातील गावकरी व कार्यकर्ते एकत्र आले होते. यावेळी जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने होणाऱ्या आदिवासी सांस्कृतिक शोभायात्रेबाबत माहिती आणि निमंत्रण देणारे फलक विविध मालाड जलाशय फॉरेस्ट गेट आणि देव डोंगर आदिवासी पाडाच्या प्रवेशमार्गांवर लावण्यात आले.

या फलकांमधून आदिवासी संस्कृती, परंपरा, निसर्गाशी असलेले नाते, मातृशक्तीचा सन्मान आणि जल-जंगल-जमीन या जीवनाधारांविषयी जनजागृती करण्याचा संदेश देण्यात आला. “आमची संस्कृती, आमचा अभिमान” हा संदेश या उपक्रमाचा केंद्रबिंदू होता.

या प्रसंगी उपस्थित गावकरी आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. आदिवासी एकजुटीचे प्रतीक म्हणून अनेकांनी हात उंचावून घोषणांद्वारे आपला सहभाग व्यक्त केला. परिसरातील पाड्यांमध्ये आदिवासी समाजासाठी आपल्या संस्कृति, हक्क, अधिकार बद्दल जागरूकता निर्माण व्हावी आणि जास्तीत जास्त समाजबांधवांनी सांस्कृतिक शोभायात्रेत सहभागी व्हावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

वनहक्क समिती मुंबई, आदिवासी ग्रामसभा मालाड आणि स्थानिक पाड्यांतील समाजबांधव यांच्या सहभागातून हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला. आगामी जागतिक आदिवासी दिनानिमित्त होणाऱ्या शोभायात्रेबाबत ग्रामस्थांमध्ये सकारात्मक वातावरण तयार झाले असून, या कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आदिवासी एकजुटीचा विजय असो!
जय जोहार!

महत्त्वाच्या दुवा

आदिवासी ग्रामसभा बाबत

आदिवासी ग्रामसभा ही जंगल, जमीन आणि हक्कांच्या संरक्षणासाठी कार्य करणारी लोकशाही व्यवस्था असून, त्याचबरोबर सामाजिक कार्यासाठी समर्पित उपक्रम आहे. ही वेबसाइट आदिवासी समाजाचा आवाज, संस्कृती आणि संघर्ष लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तयार करण्यात आली आहे.

© 2026 Adivasi Gramsabha